शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; सुप्रिया सुळे दोन दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून उत्तर महाराष्ट्रात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; सुप्रिया सुळे दोन दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
Published on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे या दि १७ ते १९ ऑगस्ट तीन दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात त्या जळगाव,धुळे आणि नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमात सहभागी होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गुरुवारी दै. नवशक्तिशी बोलतांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून उत्तर महाराष्ट्रात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ही या पक्षाची सुप्त ताकद आहे, हे पक्षाला लक्षात आले आहे. केवळ कार्यकर्ते व पदाधिकारी यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हे लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा झाल्यानंतर आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे या जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यात सहा जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले असून त्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पक्ष बळकटी बरोबरच महिला एकत्रिकरणावर भर दिला जात आहे.

गुलाबराव देवकर विरुद्ध गुलाबराव पाटील लढत

खा. सुप्रियाताई सुळे या शनिवारी सकाळी जळगावला येत असून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ समोर ठेवून सकाळी जळगावला संभाजी नाट्यमंदिरात आयोजित महिला मेळाव्यात त्या मार्गदर्शन करतील. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची लढत विद्यमान पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी होणार आहे. त्यामुळे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. दुपारी पारोळा येथे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या समर्थनार्थ महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी अमळनेर येथे देखील महिला मेळाव्याचे आयोजन केले असून नंतर त्या धुळ्यास रवाना होतील.

२५ ऑगस्टला पंतप्रधान जळगावमध्ये

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सगळे पक्ष लागले असल्यामुळे सुप्रिया सुळेंपाठोपाठ दि २० ते २३ ऑगस्ट शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत हे चार दिवस जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. तर दि. २५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जळगाव दौऱ्यावर येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in