छत्रपती संभाजीनगर : स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने वर्षभर विविध भारतीय संस्कृती जोपासणारे उपक्रम, सण, उत्सव साजरे केले जात तरुणाईचा एवढा मोठा प्रतिसाद मिळणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब असून, पारंपारिक उत्सव साजरे करणे हेच स्वाभिमान क्रीडा मंडळाचे वर्चस्व असल्याचे गौरवोद्गार देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी व्यक्त केले. एन ३ येथील शिवछत्रपती महाविद्यालयासमोरील गरबा मैदानावर आयोजित रास गरब्यात दांडिया प्रेमींचा उत्साह वाढवून शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि रील्स स्टार हिंदवी पाटील सातकर, साक्षी धुमाळ यांचे विशेष आकर्षण होते. त्यांनी शुभेच्छा देत पारंपारिक वेशभूषेत आलेल्या दांडिया प्रेमींचा उत्साह वाढविला. स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आयोजक प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, सचिव विशाल दाभाडे यांनी त्यांचे स्वागत केले.
स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन३ रास दांडियास लक्षणीय प्रतिसाद दिवसेंदिवस मिळत असून, दांडियाप्रेमींची दांडिया खेळण्याठी चढाओढ सुरू होत गर्दीचे उच्चांक गाठत आहे. भारतीय संस्कृतीतील अस्सल दांडिया खेळत पारंपारिक वेशभूषेतून स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन ३, रास दांडियात तरुणाईचा बेधुंद जल्लोष दिसून आला. मराठी, हिंदी, गुजराती गाण्यांवर ताल धरत लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनीच ठेका धरला. उत्तोरोत्तर रंगत जाणऱ्या या रास दांडियाने पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले.
या पारंपारिक रास दांडियात सहभागी होऊन रास दांडिया खेळण्याचे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, शहराध्यक्ष विशाल दाभाडे यांच्यासह मुख्य व्यवस्थापक प्रदीप राठोड, उत्सव समितीचे अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष अमरसिंग ठाकूर, उपाध्यक्ष अभिजित खरात, नितेश टेकाळे, सचिव विक्रांत पंजाबी, जीवन रौंदळ, पंकज परदेशी, सिराज कुरेशी, रऊफ पठाण, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, सिद्धी डेकोरेटर्स चे मनोज मामाजी बोरा, संदीप साऊंड चे संदीप काळे, छायाचित्रकार नितीन शेजूळ, यांनी केले आहे.
अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची उपस्थिती
स्मिता गोंदकर हि एक अष्ट पैलू अभिनेत्री असून स्मिता चे वॉन्टेड बायको नंबर १, मुंबईचा डब्बेवाला, मि. अँड मिसेस अनवॉन्टेड , जस्ट गंमत, भय, ये रे येरे पैसा २, बलोच, आणि नुकताच दिल दोस्ती दिवानगी हे सिनेमे रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत. बिग बॉस मराठीमुळे स्मिताला एक वेगळी ओळख मिळाली. ती तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि पडद्यावर अनेक पात्रे साकारण्याच्या तिच्या क्षमतेसाठी ओळखली जाते आणि म्हणूनच तिच्या वेगळेपणामुळे सोमवारी (दि.२३) ती स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन.३, रास दांडिया मध्ये उपस्थित राहणार आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, स्मिता विविध सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी आहे. स्मिताचा उत्कृष्ट अभिनय ‘अथांग’ या मराठी चित्रपटात आला, ज्यात तिने मुख्य भूमिका केली होती. स्मिता सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे, जिथे तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. पप्पी दे पारूला या गाण्याद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली स्मिता गोंदकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल असून मराठी हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत तिने आपला ठसा उमटवला आहे.