छत्रपती संभाजीनगर : एसटी बस व टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू ३० जण जखमी, १० जणांची प्रकृती चिंताजनक

हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे
छत्रपती संभाजीनगर : एसटी बस व टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 
३० जण जखमी, १० जणांची प्रकृती चिंताजनक

जिल्ह्यातील सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार, तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सहा वाजण्या सुमारास सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमध्ये हा भीषण अपघात झाला. यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करत होते. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघातातील टेम्पोची ओळख देखील पटत नाही. या अपघातानंतर टेम्पोमधील सिलिंडर रस्त्यावर सांडले होते. तर दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे.

अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्याने जाणारे वाहनधारक देखील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in