मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा जागीच मृत्यू, तर २८ जण गंभीर जखमी

ब्रेक फेल झाल्याने एककंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे हा अपघात घडला
मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा जागीच मृत्यू, तर २८ जण गंभीर जखमी
Published on

मुंबई- धुळे - आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झाल्याने एककंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे हा अपघात घडला. यात १२ जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर २८ लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्ठळी दाखल झाले आहेत.

धुळे-मुंबई- आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यात मध्यप्रदेशच्या सीमेलगत पळासनेर हे गाव येतं. या गावाजवळ दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महामार्गावरुन जाणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो बाजूच्या हॉटेलमध्ये शिरला. यात १२ जणांना जागीच चिरडून मृत्यू झाला आहे. तर जवळपास २८ जण या अपघातात जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असून जखमींना उपराचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा कंटेनर हॉटेलमध्ये घुसला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतर वाहनं देखील उभी होती. यावेळी कंटेनर त्या वाहनांना देखील धडकला. या अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अनेक जणांना या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्ती केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in