कशेडी घाट ते पोलादपूर अंतर होणार १० मिनिटांत पार; कशेडी घाटातील बोगद्याची एक मार्गिका होणार महिना अखेरीस खुली

राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी या कामाची पाहणी केली होती.
कशेडी घाट ते पोलादपूर अंतर होणार १० मिनिटांत पार; कशेडी घाटातील बोगद्याची एक मार्गिका होणार महिना अखेरीस खुली

मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कशेडी बोगद्याच काम जवळपास पूर्ण झालं असून या बोगद्याची एक मार्गिका जून महिन्याच्या अखेरीस वाहतूकीसाठी खूली करण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे खेड तालु्क्यातील कशेडी घाट ते रायगडमधील पोलादपूर हे अंतर फ्क्त १० मिनिटात पार करता येणार आहे.

कशेडी घाट हा खूप धोकादायक मानला जात होता. मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास करताना या घाटात नेहमी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात येथे दरड तसंच माती कोसळण्याच्या अनेक घटना घडतात. यामुळे अनेक अपघात देखील घडले आहेत. यामुळे गेल्या दोन वर्षापासून कशेडी घाटात बोगद्याचं काम सुरु होतं. एका बोगद्याचं काम पूर्ण झालं असून राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी या कामाची पाहणी केली होती.

मुंबई-गोवा महामार्गानं सिंधुदुर्गात जातान कशेडी घाट हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. सिंधुदुर्गात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा इंटरव्हल आहे. कारण पनवले पासून १५० किमीचा टप्पा कशेडी घाटात पूर्ण होतो. हा घाट उतरल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याला सुरुवात होते. त्यामुळे कशेडी घाटातील बोगदा सुरु झाल्यानं चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. जून अखेरीस सुरु होणाऱ्या या नव्या बोगद्यामुळे कशेटी घाट ते रायगडमधील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. अवजड वाहनांमुळे हे अंतर पार करण्यासाठी २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो. तर जड वाहनांना ४० मिनिटांचा कालावधी लागतो. तसंच अवघड वळणांमुळे अपघात देखील होतात. या सर्वाला कशेडी घाटातील बोगदा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in