
पुणे : महाराष्ट्रातून पाऊस ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान परतणार आहे, असा महत्त्वाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुराग काश्यपी म्हणाले की, विविध प्रदेशांमध्ये, विशेषत: उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य भारतातील पाऊस झपाट्याने कमी होत आहे. भारतीय हवामान खाते या भागातील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे. मान्सून परत जाण्याच्या सूचित करणाऱ्या अनुकूल परिस्थिती ओळखल्या आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात पाऊस परतत असल्याचे अनुकूल वातावरण दिसत आहे. पाऊस किनारपट्टीवरून दूर गेल्यास मान्सून हळूहळू परतू लागतो.
उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, प. विदर्भातील काही भागातून पाऊस लवकरच परतेल. राज्यातून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस परतून जाईल. हवामान खात्याच्या हवामान तज्ज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी कोकणात येते ४८ तास पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सातारा, कोल्हापूर, पुण्यात येते ७२ तास पावसाची शक्यता आहे.