कायदा शरद पवारांच्या बाजूने

ॲड. असिम सरोदे यांचे मत
कायदा शरद पवारांच्या बाजूने

पुणे : अजित पवार हे बंड करून सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमचाच आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, कायदा शरद पवारांच्या बाजूने आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी नियुक्त केलेला प्रतोद आणि प्रदेशाध्यक्ष हेच कायदेशीर आहेत, असे कायदेतज्ज्ञ ॲड. असिम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करत सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथदेखील घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कोणाचा, असा प्रश्न उपस्थित केल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. ॲड. सरोदे म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी राजकारणातील नवीन बेकायदेशीर बाराखडी निर्माण केली आहे. त्याच पावलांवर पाऊल टाकत अजित पवार सत्तेच्या एक पदावर स्थानापन्न झाले आहेत. हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. अजित पवार आणि शरद पवारांमधील मतभेद हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या उदाहरणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन होत नाही, हेही दिसून येते. ही घटनाबाह्यता प्रस्थापित होत आहे. तो लोकशाहीला धोका आहे,” अशी चिंता ॲड. सरोदे यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in