महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस तर होणार नाही ना याची चर्चा

देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीमध्ये आपली सूत्र हलवत आहेत
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस तर होणार नाही ना याची चर्चा

एकीकडे एकनाथ शिंदे यांचे नाट्यसत्र असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीमध्ये आपली सूत्र हलवत आहेत. शिवसेनेतील भूकंपानंतर ते नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी नाशिकच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचे सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारवर मोठे संकट येण्याची शक्यता असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस तर होणार नाही ना याची चर्चा सध्या सुरु आहे.   

एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाले होते. सध्या शिंदे आमदारांसोबत सुरत मध्ये गेले आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेले काही दिवसापासुन मतभेद सुरु होते. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मार्गदर्शन करावे अशी शिंदेची मागणी होती परंतु आदित्य ठाकरे यांनी आमदारांशी बातचीत केल्याने शिंदे नाराज झाले होते. त्यामुळे शिंदेच्या नाराजगीमुळे मते फुटण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in