‘फास्ट टॅग’ रिचार्ज करणाऱ्या महिला न्यायाधीशांना चोरट्यांनी गंडवले

‘फास्ट टॅग’ रिचार्ज करणाऱ्या महिला न्यायाधीशांना चोरट्यांनी गंडवले

गुगलवरुन ॲप डाऊनलोड करीत त्यातून ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करणाऱ्या महिला न्यायाधीशांना सायबर चोरट्यांनी २ लाख ७५ हजाराने गंडविल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना १४ ते १५ मेदरम्यान घडली. सोनाली मुकंद कनकदंडे ( वय ४२ रा. सिव्हील लाईन) यांना त्याचे खासगी वाहनासाठी आवश्‍यक असलेल्या ‘फास्ट टॅग रिजार्ज’ करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवरुन फास्ट टॅग रिचार्ज ॲप डाउनलोड केले. दरम्यान त्यामध्ये बॅकेचे डेबिटकार्ड नंबर टाकला. त्यातून फास्ट टॅग रिचार्ज केले. यानंतर त्यांनी मोबाईलवर नेटबॅकींग उघडले असता पासवर्ड व युजर आयडी ‘इन हॅन्डलींग’ दाखवित असल्याचे आढळून आला.

त्यामुळे त्यांनी बॅकेच्या कस्टमर केअरला विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या वेगवगळया खात्यातुन २ लाख ७५ हजार ३९९ रुपये आरोपीने कोणत्यातरी खात्यात वळते केल्याची बाब आढळून आली. दरम्यान याबाबत मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी सातत्याने कुठलेही ॲप डाऊनलोड न करण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in