नागपूरमध्ये कार-ट्रक अपघातात दहा महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू

रामटेक-भंडारा मार्गावरील दुर्घटना
नागपूरमध्ये कार-ट्रक अपघातात दहा महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू

नागपूर : येथे रामटेक भंडारा मार्गावर कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला भरधाव वेगातील कार धडकल्याने दहा महिन्यांच्या बालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ वर्षीय मुलगा आणि ७० वर्षीय वृद्ध नागरिकाचा समावेश आहे. तसेच सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. हा अपघात रविवारी सायंकाळी या मार्गावरील खंडाळा गावाजवळ घडला. या गाडीत पाच लहान मुलांसह ९ जण प्रवास करत होते.

अपघातातील मृत व्यक्तींमध्ये परशराम भेंडारकर, हिमांशू भेंडारकर आणि भार्गवी बोंद्रे यांचा समावेश आहे. तसेच या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरपासून सुमारे ६० किमी अंतरावर रामटेक नागपूर मार्गावरील खंडाळा येथे घडली. कारमधील सर्वजण भंडारा जिल्ह्यातील साकोली इथले रहिवाशी आहेत. ते देवदर्शनासाठी रामटेकला गेले होते. देवदर्शन करून ते पुन्हा भंडाऱ्याकडे परत जात होते. यावेळी महामार्गावर एक कंटेनर उभा होता. कंटेनरचालकाने इंडिकेटर देखील सुरू केले नव्हते. दरम्यान, कारचालकाला ट्रकचा अंदाज न आल्याने कार उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, कारमधील एका वृद्धासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, तर इतर ६ जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यावर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. यानंतर ५ जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in