दापोलीमध्ये दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, १६ प्रवासी जखमी

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरीवली माटवण मार्गे दापोली एसटी शहरात येत असताना हा अपघात झाला
File Photo
File Photo

मौजे दापोलीत आज दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन चालक वाहकांसह १५ जण जखमी झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र गणेशोत्सवाला एक आठवडा असतानाच हा अपघात झाल्याने एसटी प्रवाशाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, यातील किरकोळ जखमी प्रवाशी बसमधून बाहेर पडत तेथून निघून गेल्याने जखमींचा नेमका आकडा पुढे येऊ शकलेला नाही. या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने दापोलीतील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरीवली माटवण मार्गे दापोली एसटी शहरात येत असताना हा अपघात झाला. त्याचवेळी दापोली-मुरादपूर ही बस दापोली आगारातून मंडणगडातील मुरादपूरच्या दिशेने आपल्या मार्गिकेतून चालली होती. मौजे दापोली फाट्यानजिकच्या वळणावर बोरीवली दापोली बस चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने त्यांची बस दापोली मुरादपूर बसवर येऊन धडकली. दापोलीच्या शाळांमध्ये येणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी बहुसंख्येने सकाळच्या बोरीवली-दापोली बसमधून प्रवास करतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in