उमर खालिदचा जामीनअर्ज फेटाळला

उमर खालिदला दिल्ली कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणात त्याचा जामीनअर्ज पुन्हा फेटाळण्यात आला आहे. दिल्लीतील न्यायालयाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला जामीन नाकारला आहे. उमर खालिदवर दंगलीचा कट रचल्याप्रकरणी आणि यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल आहे. दरम्यान, खालिदसह इतरांवर दंगलीचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. या दंगलीत ५३ लोक मारले गेले आणि ७०० हून अधिक जखमी झाले होते.

Related Stories

No stories found.