अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

महाराष्ट्रामध्ये एकीकडे धुळवडीचा उत्साह असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

एकीकडे धुळवडीचा उत्साह असताना दुसरीकडे संपूर्ण राज्यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच औरंगाबाद, नाशिक, नांदेड, अहमदनगर, ठाणे, रायगड या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. तसेच, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

नाशिक जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २ दिवसांच्या अवकाळी पावसाने तब्बल २६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे कांद्याचे भाव गडगडले असताना दुसरीकडे या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ढगांचा गडगडाट, विजांच्या लखलखाटात अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे शेतात उभे पिक भुईसपाट झाले असून गहू, हरबरा पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांसाठी प्रशासन काय पाऊल उचलते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in