राम मंदिराची भेट राजकीय फायद्यासाठी नाही- आदित्य ठाकरे

महाराष्ट्रातील सर्व भाविकांसाठी अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधले जाईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बांधकामासाठी
राम मंदिराची भेट राजकीय फायद्यासाठी नाही- आदित्य ठाकरे

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackery) बुधवारी राम मंदिरात पूजा करण्यासाठी अयोध्येत पोहोचले. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले की, राम मंदिराची भेट राजकीय फायद्यासाठी नाही. मी आणि शिवसेनेचे नेते धार्मिक हेतूने येथे आलो असून यामागे कोणताही राजकीय फायदा नाही, असे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रातील सर्व भाविकांसाठी अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधले जाईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बांधकामासाठी पत्रव्यवहार करतील.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत दर्शनासाठी 1000 हून अधिक शिवसैनिक आधीच मंदिरात पोहोचले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे मंगळवारी ठाकरे यांच्या दौऱ्याच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी अयोध्येत पोहोचले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in