
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी आपला पक्ष शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगितले. "आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत उभे राहू. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत," असं पवार म्हणाले.
बंडखोर आमदार इच्छुक असतील तर पक्ष महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार आहे, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, सरकार वाचवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची (राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना) आहे. त्यांनी असे विधान का केले ते फक्त संजय राऊत यांनाच माहीत आहे," असे उपमुख्यमंत्री म्हणाले.