हॉटेलमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे नेमकं कुठे जाऊन आले ?

साडेसहा वाजता मातोश्रीवर भेट घेणार असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, आमची भूमिका काल होती तशीच आहे.
हॉटेलमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे नेमकं कुठे जाऊन आले ?

काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे हॉटेलमधून बाहेर पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. अशावेळी ते दिल्ली ला जाणार की थेट मुंबईला येणार यावर मोठ्या प्रमाणावर भाकितं सुरु झाली, मात्र प्रत्यक्षात एकनाथ शिंदे कामाख्या मंदिराचे दर्शन घेऊन गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये परतले. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर अडीच तासांनी ते कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे समजते.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर इकडे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सायंकाळी साडेसहा वाजता मातोश्रीवर भेट घेणार असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, आमची भूमिका काल होती तशीच आहे. सरकारला वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in