दसरा मेळावा कोणाचा ? शिंदे गटाने तयार ठेवला 'हा' दुसरा पर्याय

मुंबईतील शिवतीर्थासाठी दोन्ही बाजूंकडून दबाव निर्माण केला जात आहे. मात्र शिंदे गटाने दुसरा पर्यायही तयार केला आहे
दसरा मेळावा कोणाचा ? शिंदे गटाने तयार ठेवला 'हा' दुसरा पर्याय
ANI

दसरा मेळावा कोणाचा आणि कुठे होणार? अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट हे दोघेही दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. मुंबईतील शिवतीर्थासाठी दोन्ही बाजूंकडून दबाव निर्माण केला जात आहे. मात्र शिंदे गटाने दुसरा पर्यायही तयार केला आहे.

शिंदे गट शिवतीर्थ की वांद्रे कुर्ला परिसर यापैकी कुठे होणार दसरा सभा घेणार ? याकडे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे. शिवतीर्थावरच सभा घेण्यासाठी आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा दबाव निर्माण केला आहे. ज्या मैदानावरून बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांचा देशभर प्रसार केला, ज्या मैदानातून बाळासाहेबांनी पक्षाची मुळे रोवली, त्याच मैदानातून बाळासाहेबांचे स्मारक आहे, त्याच मैदानातून बाळासाहेबांचे विचार मांडण्यासाठी शिंदे गट ठाम आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची दसरा सभा होणार हे निश्चित झाले आहे. मात्र या सभेच्या नेमक्या ठिकाणावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरही बोट ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून परंपरेने सुरू झालेला दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा, असा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह आहे. यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच शिंदे गटाने वांद्रे कुर्ला संकुलातील मैदान बुक केले आहे.

भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारची हकालपट्टी करून नवे सरकार स्थापन केले. खरी शिवसेना कोण, यावर न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असला तरी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आमदार व कार्यकर्त्यांनी येत्या दसरा मेळाव्याला शिवसेना आणि आपलाच मेळावा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नेमका कोणाचा मेळावा कुठे होणार हे लवकरच कळेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in