‘पत्नी आपल्या पतीला इतर महिलेसोबत शेअर करू शकत नाही’;अलाहाबाद हायकोर्ट

‘पत्नी आपल्या पतीला इतर महिलेसोबत शेअर करू शकत नाही’;अलाहाबाद हायकोर्ट

पतीने दुसरे लग्न केल्याने पत्नीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने संबंधीत पतीला दोषी ठरवले. या निकालाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, अलाहाबाद हायकोर्टाने ‘पत्नी आपल्या पतीला इतर महिलेसोबत शेअर करू शकत नाही’, असे नमूद करत पतीची याचिका फेटाळून लावली आहे.

पतीने दुसरे लग्न केल्याने पत्नीने आत्महत्या केली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘विवाहित महिला तिच्या पतीबद्दल खूप पझेसिव्ह असते. ती तिच्या नवऱ्याला इतर कोणासोबतही पाहू शकत नाही’, असे मत अलाहाबाद हायकोर्टाने याप्रकरणी नोंदवले व पतीची फेरविचार याचिका फेटाळून लावली.

पत्नीने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आत्महत्या केली होती. सप्टेंबर २०१८ मध्ये आरोपी सुशील कुमारच्या पत्नीने त्याच्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम ३२३, ४९४, ५०४, ५०६, ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यात महिलेने आरोप केला होता की, आरोपीचे आधीच दुसऱ्या महिलेसोबत लग्न झाले आहे. त्या लग्नापासून त्याला दोन मुले आहेत. त्यानंतर घटस्फोट न घेता त्याने तिसरे लग्न केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in