Nashik : पुन्हा ठाकरे- शिंदे गटात राडा; हवेत केला गोळीबार, एकजण ताब्यात

महाराष्ट्र सत्तानंतर झाल्यापासून (Nashik) अनेकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत
Nashik : पुन्हा ठाकरे- शिंदे गटात राडा; हवेत केला गोळीबार, एकजण ताब्यात

महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि शिवसेना पक्षाचे दोन गट निर्माण झाले. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एक गट आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट निर्माण झाला. त्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी भाजपशी (BJP) युती करत महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आणले. पण, यानंतर शिंदे आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठे वाद पाहायला मिळाले. नुकतेच नाशिकमध्येही (Nashik) शिंदे आणि ठाकरे आमनेसामने आले. यावेळी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी यासंदर्भात एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली गावात गुरुवारी संध्याकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या चर्चेत शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण सुरु झाले. यादरम्यान, शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील लवटेने बंदूक काढत हवेत गोळीबार केला. यानंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. तो शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटेंचा पुतण्यादेखील आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in