
मुंबई : शेअरबाजारात खरेदी केलेले शेअर ज्या खात्यात सुरक्षित ठेवले जातात त्या डिमॅट खात्यांच्या एकूण संखेत ऑक्टोबर महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या महिन्यात एकूण १३.२० कोटी नवी डिमॅट खाती उघडली गेली आहेत.
भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. चांगला परतावा मिळत असल्याने शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. यामुळे देशभरात डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ होत. ऑक्टोबर महिन्यात डिमॅट खाती उघडणाचा विक्रम झाला आहे. ऑक्टोबरमध्ये १३.२२ कोटींहून अधिक लोकांनी डिमॅट खाती उघडली आहेत. डिमॅट खाती उघडण्याचा हा आकडा ११ महिन्यांतील उच्चांक आहे. यापैकी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसमध्ये सुमारे ९.८५ कोटी खाती आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीमध्ये ३.३८ कोटी खाती आहेत. भारतातील शेअर बाजारातील उलाढालीत मार्च महिन्यानंतर मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत मिडकॅप म्हणजे मध्यम आकाराच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. बहुतेक गुंतवणूकदार मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये पैसे गुंतवणे सुरक्षित मानतात. मार्चपासून आतापर्यंत सेन्सेक्स ९.३४ टक्के आणि निफ्टी ११.२४ टक्क्यांनी वाढला आहे. शेअर बाजारात तेजी सुरू आहे. त्यामुळे डिमॅट खात्यांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. डिजिटल क्रांतीमुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपन्या अधिक ग्राहकांना जलद सेवा देण्यास सक्षम झाल्या आहेत. सर्वच ब्रोकर कंपन्यांचे डिजिटल अॅप असल्याने डीमॅट खाते उघडणे आणि व्यवहार करणे खूपच सोपे झाले आहे. या अॅप्समुळे जुन्या कंपन्यांनाही त्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करावी लागली आहे.
डिमॅट खाते म्हणजे काय
शेअर बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, शेअर बाजारात शेअर्सची खरेदी किंवा विक्री करायची असेल, तर डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते हे बँक खात्यासारखे असते. डिमॅट खात्यात लोक त्यांचे शेअर ठेवू शकतात.