मुंबईत कोरोनाचे १,७२४ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ८३ हजार ५८९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात
मुंबईत कोरोनाचे १,७२४ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
File Photo

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पहावयास मिळत असून मंगळवारी दिवसभरात १,७२४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ८३ हजार ५८९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९,५७५ वर पोहोचली आहे. दिवसभरात १,२४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ५२ हजार २०१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ११ हजार ८१३ सक्रिय रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in