मध्य रेल्वेवर १८ नवीन एटीएम सुरू करणार

१८ एटीएमची भर पडून ती संख्या ३९ वर जाईल
मध्य रेल्वेवर १८ नवीन एटीएम सुरू करणार
Published on

मुंबई : प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा भाग म्हणून मध्य रेल्वेने १८ नवीन एटीएम मशीन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ४० लाख प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. सर्वकाही सुरळीत झाल्यास येत्या दोन महिन्यांत हे एटीएम सुरू होतील.

१७ जुलै रोजी ‘ई-निविदा’ यशस्वी झाल्यानंतर एटीएम बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मे. हिताची पेमेंट सर्व्हिस प्रा. लिमिटेड या कंपनीने सर्वात मोठी निविदा भरली. रेल्वेने ‘ई-निविदा’ पद्धत सुरू केल्याने निविदा प्रक्रिया अंतिम करण्याच्या प्रक्रियेतील ३० ते ४५ दिवस वाचले आहेत, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंब्रा, कुर्ला, डोंबिवली, भायखळा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कळवा, दादर, भांडुप, मानखुर्द, पनवेल, मशीद, डॉकयार्ड रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर एटीएम बसवले जातील.

सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात फक्त २१ एटीएम आहेत. आणखी १८ एटीएमची भर पडून ती संख्या ३९ वर जाईल. येत्या दोन महिन्यांत नवीन एटीएम सुरू व्हावीत, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्याचा भाग म्हणून हे एटीएम सुरू केले जाणार आहेत. त्यातून रेल्वेचा महसूल वाढण्यास मदत मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in