मुंबई शहरातील २१ इमारती अतिधोकादायक

मुंबई शहरातील २१ इमारती अतिधोकादायक

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यावर्षी २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १४ इमारतींचाही समावेश आहे.

२१ अतिधोकादायक इमारतींमध्ये ६७४ निवासी व २६६ अनिवासी असे एकूण ९२३ रहिवासी, भाडेकरू आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फेकरण्यात आलेल्या कार्यवाही नुसार १९० निवासी भाडेकरू, रहिवाशांनी स्वतःची निवार्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत ६९ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच ५ इमारतींत दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असल्याने या इमारतींमधील २२३ भाडेकरू, रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांनी इमारती रिकाम्या करण्यासाठी मंडळाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in