मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत दावोस येथे २२ सामंजस्य करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत दावोस येथे २२ सामंजस्य करार

राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत १० व्या टप्प्यात सोमवारी दावोस येथे २२ सामंजस्य करार केले आहेत. या करारांचे मूल्य २५,३७९ कोटी रुपये आहे.

या सामंजस्य कराराच्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जामंत्री नितीन राऊत व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार, या गुंतवणूकीमुळे ६६ हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. इंडोरामा कॉर्पोरेशन व इंडोकाऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्या नागपूर, कोल्हापुरात गुंतवणूक करणार आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनी पुण्यात डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक ३२०० कोटींची असणार आहेत. तसेच इंडोनेशियाची सिनारामस पल्प ॲड पेपर प्रा. लिमिटेड ही कंपनी रायगडात १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हॅवमोर आयस्क्रीम प्रा. लिमिटेड पुण्यात प्रकल्प उभारणार आहे. सोनाई इटेबल व गोयल प्रोटिन आदी कंपन्याही गुंतवणूक करणार आहेत.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ या प्रकल्पांतर्गत राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केली आहे. आतापर्यंत १० टप्प्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या प्रकल्पात आतापर्यंत २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ४ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षात कोविडचा प्रादुर्भाव असतानाही राज्याने २६ टक्के थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in