कोरोनाच्या नावाखाली २३ गिरण्या बंद

 कोरोनाच्या नावाखाली २३ गिरण्या बंद

महाराष्ट्रसह देशभरातील २३ गिरण्या कोरोनाच्या नावाखाली बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटा थोपवण्यात आल्यानंतरही बंद गिरण्या सुरू न केल्याने १० हजार कामगारांच्या ३० हजार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने बंद गिरण्या सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनचे (राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ) अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.देशभरातील २३ गिरण्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. तर एनटीसीच्या नऊ गिरण्या देशात आहेत. जानेवारी २०२०मध्ये देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यावेळेपासून गिरण्या बंद करण्यात आल्या आहेत. गिरण्या बंद केल्याने कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे.

विनावापर कोट्यवधी रुपयांची जमीन पडून आहे. या बंद करण्यात आलेल्या गिरण्यांचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे. गिरण्यांमध्ये तयार करण्यात आलेले कपडे सरकारी रुग्णालये, संरक्षण दलात गणवेश वापरासाठी सक्ती केल्यास उद्योग सक्षमपणे पुन्हा सुरू होऊ शकतो; मात्र केंद्र सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याने जाणूनबुजून बंद गिरण्या पुन्हा सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप अहिर यांनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in