केईएम रुग्णालयात महिन्याला २४० पेक्षा अधिक पक्षाघाताचे रुग्ण

जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे भारतात स्ट्रोकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
केईएम रुग्णालयात महिन्याला २४० पेक्षा 
अधिक पक्षाघाताचे रुग्ण

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित व्यायाम आणि धकाधकीचे जीवन अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये स्ट्रोकमुळे कायमचे अपंगत्व किंवा अचानक मृत्यू ओढावू शकतो. केईएम रुग्णालयांमध्ये महिन्याला २४० पेक्षा जास्त स्ट्रोकचे रुग्ण आढळतात. विशेष म्हणजे आढळणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक असते.

जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे भारतात स्ट्रोकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही वर्षांपासून ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, तरुण वयोगटातील रुग्णांची संख्य अलीकडेच वाढली आहे. जंक फूड तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन, बैठी जीवनशैली, धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि मधुमेह मेलिटस, उच्च रक्तदाब आणि विस्कळीत लिपिड प्रोफाइल ही स्ट्रोकमागची कारणे आहेत, असे केईएम रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन डांगे म्हणतात.

स्ट्रोकच्या रुग्णांचे निदान आणि उपचार करण्यासाठी वेळ मौल्यवान आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक येतो तेव्हा ६० सेकंदांत (म्हणजे १.९ दशलक्ष प्रति मिनीट) जवळजवळ ३२ हजार मेंदूच्या पेशी नष्ट होतात.

त्यामुळे स्ट्रोक दरम्यान वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच एफएएसटीला खूप महत्त्व आहे. स्ट्रोकची लक्षणे एफएएसटी म्हणजेच फास्ट या संक्षेपानुसार लक्षात ठेवता येतील, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in