Mumbai Local WR : पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या आणखी ३१ फेऱ्या

१ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी; एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या ७९ वर पोहोचणार
Mumbai AC Local
Mumbai AC Local

पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलच्या आणखी ३१ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या निर्णयांनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलची संख्या ४८ वरून ७९ वर पोहचणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून गर्दीच्या वेळेत या लोकल चालवणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

साधारण लोकलच्या जागी एसी लोकल चालवल्या जात असल्याने मध्य- पश्चिम रेल्वे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाच पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या आणखी ३१ फेऱ्या चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून या फेऱ्या सुरु होणार असून चर्चगेट, विरार, बोरिवली, दादर, मालाड स्थानकांदरम्यान या फेऱ्या होणार आहेत. दरम्यान, ८ ऑगस्टपासूनच पश्चिम रेल्वेवर आठ एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दररोज धावणाऱ्या एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या ४० वरून ४८ वर पोहोचली होती. आता आणखी ३१ फेऱ्यांची भर पडणार असून एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या ७९ वर पोहोचणार आहे. तर ताफ्यात असलेल्या सहाच्या सहा लोकल आता मार्गावर धावणार आहेत. सकाळी व सायंकाळी काही फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे गर्दी टाळण्यासाठी एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in