मध्य रेल्वेच्या एसी लोकलद्वारे प्रतिदिन ३४ हजार प्रवाशांचा प्रवास

शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेच्या इतर साधनांच्या तुलनेत एसी उपनगरीय लोकलने प्रवास करणे केवळ जलदच नाही तर सर्वात किफायतशीर ठरत आहे
मध्य रेल्वेच्या एसी लोकलद्वारे प्रतिदिन ३४ हजार प्रवाशांचा प्रवास

मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी एसी उपनगरीय लोकलला उदंड प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये दररोजच्या सरासरी ५ हजार ९३९ प्रवासी संख्येवरून जुलैमध्ये ३४ हजार ८०८ प्रवासी एवढी प्रतिदिन प्रवासी संख्या एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांची झाली आहे. दरम्यान, शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेच्या इतर साधनांच्या तुलनेत एसी उपनगरीय लोकलने प्रवास करणे केवळ जलदच नाही तर सर्वात किफायतशीर ठरत आहे. या वस्तुस्थितीमुळे एसी लोकलला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या स्थानकातून सर्वाधिक एसी लोकल तिकिटे

डोंबिवली - ९४,९३२ तिकिटे

ठाणे - ८४,३०९ तिकिटे

कल्याण - ७७,४१२ तिकिटे

सीएसएमटी - ७०,४४४ तिकिटे

घाटकोपर - ५३,५१२ तिकिटे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in