मुंबई: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभागामार्फत आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षे २०२३ साजरे करण्याच्या उद्देशाने पहिला ईट राईट मेला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाय न्यूट्रिशन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मुंबई येथे साजरा केला. येथे ७० विद्यार्थ्यांनी ३५ नावीन्यपूर्ण अशा भरडधान्याच्या पाककृती सादर केल्या.
अन्न आणि औषध प्रशासन २०२३ भरड धान्य वर्ष साजरे करत आहे. यात ईट राईट मेळाव्यात एकूण ७० विद्यार्थ्यांनी ३५ नावीन्यपूर्ण अशा भरडधान्याच्या पाककृती सादर केल्या. त्याबरोबर भरडधान्य हे उद्याचे अन्न, भरडधान्याचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयांवर २३ विद्यार्थ्यांनी पोस्टर सादर केले. विद्यार्थ्यांनी भरडधान्याच्या बाबतीत असलेले ज्ञान व जाण बघून अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन अनुपमा पाटील, सहाय्यक आयुक्त (अन्न) केले होते. सदर कार्यक्रमासाठी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट दादर या कॉलेज मधील नाडकर (उपप्राचार्य) तसेच स्वतः अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांचेसह सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शैलेश आढाव उपस्थित होते.