
मुंबई : अल्फा कम्युनिकेशनचा उपक्रम असलेल्या पहिल्यावहिल्या अल्फा अवॉर्ड्स २०२३चे पुरस्कार वितरण गुरुवारी मुंबईत करण्यात आले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रंगलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी माजी खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, अल्फा कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई आणि यलो स्पायडरच्या अध्यक्षा डॉ. सुहानी मेंडोसा तसेच लॉरेंस अँड मायोचे संचालक डॉ. विवेक मेंडोसा मंचावर उपस्थित होते. दृष्टीहिन कलाकारांनी सादर केलेल्या अदाकारीने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढत गेली. यावेळी परीक्षक मंडळातील लॉरेंस अँड मायोचे संचालक डॉ. विवेक मेंडोसा, डॉ. मुकेश बात्रा, जमनालाल बजाज कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. श्रीनिवास अय्यंगार, वसंतदाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. आलम शेख आणि डॉ. संगीता कामत उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ४३ पुरस्कार विजेत्यांपैकी पाच जणांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे कोरोनायोद्धा लायन दारा पटेल, कायदेशीर क्षेत्रात प्रभूत्व गाजवणारे ॲॅड. स्वराज जाधव आणि ॲॅड. अंकुर कुमार तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे प्रो. सायरस गोंडा आणि डॉ. सुहानी मेंडोसा तसेच युवा उद्योजक अहाना शेख यांचा समावेश होता. काही पुरस्कार विजेत्यांना उदय सामंत, डॉ. विकास महात्मे आणि परीक्षक मंडळातील सदस्यांकडून गौरवण्यात आले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, “फक्त पुरस्कार स्वीकारणे पुरेसे नाही, चांगल्या व्यक्तींनी पुढे येऊन देशाच्या विकासासाठी हातभार लावावा.”