
मुंबई : धारावी बस आगारातील बस रुट नंबर ४६३ ही रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास धारावी पोलीस ठाण्याजवळ येताच सुमन पांडुरंग हजारे (६०) या सिट्स वरुन खाली पडल्या. बस चालक व वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी महिलेला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
धारावी बस आगारातील बस रुट नंबर ४६३ बस नंबर १७६४ ही धारावी ते दादर प्लाझा दरम्यान धावते. रविवारी सायंकाळी ही बस धारावी पोलीस ठाण्याजवळ येताच सुमन पांडुरंग हजारे या सिट्स वरुन खाली पडल्या. त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.