ब्रेन डेड २.९ वर्षाच्या एका मुलाला नवजीवन तर दुसऱ्याला दृष्टी

अवयवदानाचे हे दानशुर कृत्य प्राप्तकर्त्यांना आशा आणि पुनर्वसनाचे बळ देते
ब्रेन डेड २.९ वर्षाच्या एका मुलाला नवजीवन तर दुसऱ्याला दृष्टी

मुंबई : ब्रेन डेड झालेल्या २.९ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबाने त्याचे यकृत आणि कॉर्निया दान करून एकाला नवजीवन, तर दुसऱ्याला दृष्टी मिळाली आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये हे अवयवदान यशस्वीरित्या करण्यात आले आहे. ब्रेन डेड झालेल्या चिमुरड्याच्या कुटुंबाने आपले दुःख बाजूला ठेवून आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेत इतर दोघांनी नवे आयुष्य मिळवून दिले.

वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी यकृत आणि कॉर्निया यशस्वीरित्या रिट्राईव्ह केले आणि दोन जीव वाचविले. लेफ्टनंट जनरल डॉ व्ही रविशंकर, एमएस, डीएनबी, एमसीएच, कन्सल्टंट कार्डिओव्हस्कूलर सर्जन आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ), लीलावती हॉस्पिटल, वांद्रे सांगतात की, बाळाचे अवयव रिट्राईव्हल शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने आणि प्रसंगावधान राखत यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. अवयव दान करुन या मुलाला आजही जिवंत ठेवण्याच्या त्याच्या पालंकांच्या भूमिकेचे लीलावती हॉस्पिटलच्या टीमने कौतुक केले तसेच हा अतिशय कठोर निर्णय घेऊन एक अनोखे उदाहरण स्थापित केले आहे.

झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ. एस के माथूर सांगतात की, अवयवदानाचे हे दानशुर कृत्य प्राप्तकर्त्यांना आशा आणि पुनर्वसनाचे बळ देते. या प्रसंगातून कुटुंबाचा निस्वार्थीपणा आणि मानवतेचे दर्शन आम्हाला घडले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in