रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

रुग्णावर व्यवस्थित उपचार सुरू नसल्याचे सांगितले
रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

मुंबई : अंधेरीतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या पेशंटच्या तीन नातेवाईकांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. नर्सला शिवीगाळ करून एका डॉक्टरच्या कानशिलात लगावल्याने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाहिम गनी अहमद, इफजाल गनी अहमद आणि गौसिया अहमद अशी या तिघांची नावे आहेत. राजीव रजनीकांत श्रॉफ हे अंधेरीतील धिरुभाई अंबानी रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर महिन्यात साजिदा अहमद अंबानी रुग्णालयात दाखल झाली असताना तिच्या नातेवाईकांनी रुग्णावर व्यवस्थित उपचार सुरू नसल्याचे सांगत डॉक्टर राजीव श्रॉफ यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळही केली. अखेर वर्सोवा पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in