मुंबई : फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ३४ लाखांचा अपहारप्रकरणी शैलेश शाह या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले. भिकूभाई ठाकरशी चौहाण हे कांदिवली येथे राहत असून, त्यांचा प्लबिंग आणि पेटींगचा व्यवसाय आहे. पाच वर्षांपूर्वी ते नवीन घराच्या शोधात होते. याबाबत त्यांनी त्यांच्या काही मित्रांना सांगितले. त्यापैकी एका मित्राने त्यांना शैलेश शाह या बांधकाम व्यावसायिकाची माहिती दिली होती. त्याच्या कंपनीकडून काही इमारतीच्या पुर्नविकासाचे काम सुरू असून, त्याच्याच एका प्रोजेक्टमध्ये त्यांनी घर घ्यावे, असा सल्ला दिला होता. याच दरम्यान शैलेश शाहचा मालाड येथील लिबर्टी गार्डनजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीचे काम पाहिल्यानंतर त्यांनी शैलेश शाहची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना त्याच्या मालाड येथील दिपदर्शन अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते.