मंत्रालयासमोरच जोडप्याचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न ;दोघांविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

तीन वर्षे उलटूनही या गुन्ह्यांचे आरोपपत्र स्थानिक पोलिसांनी लोकल कोर्टात दाखल केले नाही.
मंत्रालयासमोरच जोडप्याचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न ;दोघांविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : मंत्रालयासमोरच एका जोडप्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला आहे. या दोघांनाही मरिनड्राईव्ह पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विनयभंगासह जातीवाचक शिवीगाळ करणे आणि पोक्सोच्या गुन्ह्यांतील आरोपीविरुद्ध तीन वर्षे उलटूनही स्थानिक पोलिसांनी आरोपपत्र सादर न केल्याने त्यांनी नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दुपारी सव्वाबारा वाजता मंत्रालयाजवळ एक जोडपे आले आणि त्यांनी त्यांच्याकडील बाटलीतून पेट्रोलसदृश द्रव्य स्वत:च्या अंगावर ओतले. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच, त्यांनी या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघेही स्वत:च्या अंगावर द्रव्य टाकत होते. त्यामुळे या पोलीस पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची नावे विजय आणि लक्ष्मी (नावात बदल) असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही वाशिमचे रहिवाशी आहेत. चौकशीदरम्यान वाशिम पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. तीन वर्षे उलटूनही या गुन्ह्यांचे आरोपपत्र स्थानिक पोलिसांनी लोकल कोर्टात दाखल केले नाही. याबाबत पोलिसांना सतत विचारणा करूनही त्यांनी आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर केले नव्हते. त्यातून नैराश्यातून त्यांनी मंत्रालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने मुंबईत आल्याची कबुली दिली. या माहितीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in