मोबाईल घेतला म्हणून अल्पवयीन मुलाची आत्महत्या ;मालवणीतील घटना
मुंबई : मोबाईलवर गेम खेळताना रागाच्या भरात वडिलांनी मोबाईल घेतल्याने एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांची मालवणी पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांनी घडलेला प्रकार सांगून कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरू केला आहे.
मालवणी परिसरात राहणाऱ्या मृत मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन होते. त्यावरुन त्याचे त्याच्या वडिलांशी सतत खटके उडत होते. सतत मोबाईलवर गेम खेळत असल्याने त्याला मोाबईल देण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्याने मोबाईल घेतला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी मोबाईल स्वतकडे ठेवून दिला होात. त्याचा त्याला प्रचंड राग आला होता. मोबाईल दिला नाहीतर आपण स्वतला हानी पोहचवू अशी धमकीच त्याने दिली होती. गुरुवारी रात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर यामुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुसर्या दिवशी हा प्रकार त्याच्या पालकांना समजताच त्यांनी त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्याच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे त्यांच्या जबानीवरुन पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.