मेट्रो स्टेशनजवळ घराला नागरिकांची पसंती ‘नो ब्रोकर डॉटकॉम’ची नवीन सेवा

‘मेट्रो’वर आधारित नवीन शोध पर्यायामुळे भाडेकरूंना मोठा फायदा झाला आहे
मेट्रो स्टेशनजवळ घराला नागरिकांची पसंती ‘नो ब्रोकर डॉटकॉम’ची नवीन सेवा

मुंबई : मेट्रो शहरे किंवा मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीची व्यवस्था नागरिकांची परीक्षा पाहणारी असते. गर्दीतून प्रवास करताना नागरिक मेटाकुटीला येतात. आता अनेक शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सुरू झाली आहे. या मेट्रोच्या परिसरात घर खरेदी किंवा भाड्याने घेण्यास नागरिकांची पसंती आहे. ग्राहकांना मेट्रो जवळच्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी ‘नो ब्रोकर डॉटकॉम’ने नवीन सेवा सुरू केली आहे.

कोविड काळानंतर आता कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाड्याने घर घेण्याची मागणी वाढली आहे. आता मेट्रो रेल्वे झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या शेजारी घर घेण्यास प्राधान्य दिले आहे. मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, दिल्ली एनसीआर भागात मेट्रोचे जाळे चांगले पसरले आहे.

पूर्वी ऑफीसपासून घर जवळ असावे, याचा शोध मर्यादित स्वरूपात घेतला जात होता. घर ते ऑफीस हे अंतर लोकांना कमी करायचे आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ घर घेण्याचा कल वाढू लागला आहे.

नो ब्रोकरच्या अर्धवार्षिक अहवालात नमूद केले की, आपल्या आवडीच्या ठिकाणी घर घेण्यास ७० टक्के जणांना अडचणी येतात. मागणी वाढल्यास रूमचे भाडे वाढते. त्यामुळे घर खरेदी व विक्रीचे गणित बिघडते. गेल्या वर्षभरापासून कार्यालयाच्या बाजूला घर घेण्याचे प्रमाण ४० टक्के वाढले आहे. टेक पार्कपासून जवळ घर घेण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसत आहे.

‘नो ब्रोकर’चे मुख्य उत्पादक व तंत्रज्ञान अधिकारी अखिल गुप्ता म्हणाले की, ‘मेट्रो’वर आधारित घर शोधण्याचा पर्याय देऊन आम्ही ग्राहकांना मदत करत आहोत. कारण वाहतूककोंडीत अडकणे ही संकल्पनाच आता सहन होत नाही. आमच्या ‘मेट्रो’वर आधारित शोध या संकल्पनेमुळे कार्यालयाच्या गृहसंकुलातील भाडे किफायतशीर राहिले आहे. यातून नैसर्गिक संसाधनांवर येणारा दबाव कमी झाला आहे. लोकांना आता घर घेण्याबाबत अनेक पर्याय मिळाले आहेत. ‘मेट्रो’वर आधारित नवीन शोध पर्यायामुळे भाडेकरूंना मोठा फायदा झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in