पोईसर नदी परिसरात संरक्षक भिंत आता बांधता येणार

पोईसर नदी परिसरात संरक्षक भिंत आता बांधता येणार

पोईसर नदी पुनर्जीवित करण्याचे काम सुरू असून नदी परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात अडथळा ठरणारी १६ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे.

मुंबईतील विविध नद्यांपैकी पोईसर नदी ही एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी कांदिवली (पश्चिम) परिसरातील मंगूभाई दत्ताजी पुलाच्या जवळ असणाऱ्या लालजी पाडा परिसरातूनदेखील वाहते. पावसाळ्यात अतिवृष्टीदरम्यान नदीलगतच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता असते. त्यामुळे विविध उपाययोजनांमध्ये नदीच्या किनारी संरक्षक भिंत बांधण्याचाही समावेश आहे.

मात्र, ही भिंत बांधण्यात सदर परिसरात उद्भवलेल्या काही बांधकामांचा, झोपड्यांचा अडथळा येत होता. या अनुषंगाने अतारिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या स्तरावर सातत्याने समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येऊन संबंधितांशी संवाद साधण्यात आला. यानंतर आज सकाळपासून करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कारवाईदरम्यान १६ बांधकामे, झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in