बुलेटच्या मागच्या चाकात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावरून बुलेटवर पहाटेच वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात देव दर्शनासाठी आल्या होत्या
बुलेटच्या मागच्या चाकात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

वसई : वसईत बुलेट वरून प्रवास करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. बुलेटच्या मागच्या चाकात ओढणी अडकून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. कांदिवली येथील राहणाऱ्या प्रतिमा यादव या श्रावणी सोमवार निमित्ताने आपले पती मनीषकुमार यादव यांच्यासोबत मुंबई अहमदाबाद महामार्गावरून बुलेटवर पहाटेच वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात देव दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन करून सकाळी ७ वाजेच्या सुमारास हे दांपत्य परतीच्या प्रवासात महामार्गावरून पुन्हा कांदिवली येथे जाण्यास निघाले. घरी परतत असताना महामार्गावरील बाफाने ब्रीज उतरत असताना बुलेटच्या पाठीमागे बसलेल्या प्रतिमा यांच्या ड्रेसची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. त्यामुळे प्रतिमा यांना फास लागल्याने त्या बुलेटवरून खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in