शिवीगाळ हा एखाद्या व्यक्तीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही - हायकोर्टाचा निर्णय

घाटकोपर येथील तेजस परिहार याच्या विरोधात घाटकोपर पोलीसांनी भावाच्या प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला
शिवीगाळ हा  एखाद्या व्यक्तीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही - हायकोर्टाचा निर्णय

शिवीगाळ करून एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी अर्णव गोस्वामी विरुद्ध महाराष्ट्र सरकार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत आरोपी तेजस परिहारला दिलासा देत जामीन मंजूर केला.

घाटकोपर येथील तेजस परिहार याच्या विरोधात घाटकोपर पोलीसांनी भावाच्या प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी आरोपी परिहारने उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ३०६ कलम अन्वये गुन्हा दाखल करताना मृत व्यक्तीला आत्महत्येसाठी मदत करण्याचा किंवा प्रवृत्त करण्याचा आरोपीचा हेतू हे दोन घटक महत्वपूर्ण असतात.

त्यामुळे एखाद्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करताना या दोन्ही मुद्दयांवर पोलिसांचे समाधान होणे महत्वाचे आहे. त्यानुसार शिवीगाळ करून एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोपीचा हेतू सिद्ध होणारे ठोस पुरावे असणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in