मुंबई : लैंगिक अत्याचारासह खंडणीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अली मुर्तझा मेराज खान असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याने तिची बदनामीची धमकी देऊन खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पिडीत महिला ही तिच्या कुटुंबीयांसोबत जोगेश्वरी परिसरात राहते. याच परिसरात राहणाऱ्या अलीसोबत तिची ओळख झाली होती. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला मॅसेज पाठविण्यास सुरुवात केली होती. अनेकदा तो तिला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवत होता. याबाबत तिने त्याला जाब विचारून त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. काही दिवसांपूर्वी ही महिला एकटीच घरी होती. यावेळी तिच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यांच्यातील संबंधाची माहिती तिच्या पतीला सांगून तिची बदनामीची धमकी देऊन तो तिला विविध हॉटेल आणि लॉजमध्ये घेऊन जात होता. तिथे त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता. तिच्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला सांगून नंतर तो तिला ब्लॅकमेल करत होता.