साडेदहा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी नोकराला अटक

साडेदहा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी नोकराला अटक

अंधेरी येथे रमेश जगदीश शर्मा हे त्यांच्या मुलासोबत राहत असून, ते चित्रपट निर्माता आहेत.
Published on

मुंबई : फोन पे ऍपद्वारे चित्रपट निर्मात्याच्या खात्यातून चार महिन्यांत साडेदहा लाख रुपये स्वतच्या खात्यात ट्रान्स्फर करून फसवणूक केल्याप्रकरणी नोकराला डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. सय्यद इरफान जावेद असे या नोकराचे नाव असून त्याच्यावर अपहारासह फसवणूक आणि आयटीच्या विविध कमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून लवकरच अपहार केलेली रक्कम जप्त केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधेरी येथे रमेश जगदीश शर्मा हे त्यांच्या मुलासोबत राहत असून, ते चित्रपट निर्माता आहेत.

logo
marathi.freepressjournal.in