मुंबई : शासकीय कर्तव्य बजाविताना वाहतूक पोलीस शिपायांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. रुपेशकुमार राजेंद्र भागवत हे शिवडी पोलीस वसाहतीत राहत असून, सध्या कफ परेड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पोलीस ठाण्यात गुलाम शेखविरुद्ध दंगल घडवून मारामारी करणे, शिवीगाळ करुन जिवे मारणयाची धमकी दिल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यांत तो पाहिजे आरोपी होता. शोधमोहीम सुरू असतानाच या पथकाला गुलाम हा वर्ल्ड ट्रेड सेंटर गेट क्रमांक एक, मेट्रो गोदामाजवळ दिसून आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने त्याच्या तोंडातील ब्लेडने स्वतच्या छाती आणि पोटावर वार करुन स्वतला दुखापत केली. मला पकडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन त्याने ब्लेडसह गुप्तीचा धाक दाखवून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.