
सीआरझेड झोनमध्ये असलेले अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थिक तरतूद केली आहे. महिनाभरात हे रिसॉर्ट पाडले जाईल, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे भाजपनेते किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून साई रिसॉर्टप्रकरणी ते शनिवारी दापोली दौऱ्यावर आहेत. रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू कधी होणार, ती होणार नसेल तर आम्ही पाडू, असे सोमय्यांनी म्हटले आहे.