धक्कादायक : मुंबईतील फ्लॅटसाठी स्वतःच्या मुलानेच केली अभिनेत्रीची बेसबॉलच्या बॅटने हत्या

बेसबॉलच्या बॅटने हत्या करून त्यांचा मृतदेह माथेरान येथील जंगलामध्ये फेकून दिला. पण अमेरिकेत राहणार्‍या त्यांच्या दुसर्‍या मुलाला याचा संशय आला आणि त्यांनी जुहू पोलिसांना याबाबत माहिती दिली
धक्कादायक : मुंबईतील फ्लॅटसाठी स्वतःच्या मुलानेच केली अभिनेत्रीची बेसबॉलच्या बॅटने हत्या

मुंबईतील जुहू परिसरात एक अशी घटना घडली आहे, ज्याने टीव्ही जगतात खळबळ उडवून दिली आहे. जुहू येथील एका फ्लॅटमध्ये मुलाने आपल्याच ७४ वर्षीय आईची हत्या केली आहे. खून झालेली महिला प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर आहे. टीव्ही अभिनेत्री नीलू कोहलीने ही माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. नीलू कोहलीने एका न्यूज पोर्टलला सांगितले की, वीणा यांनी जवळपास 5 वर्षे 'मेरी भाभी' या मालिकेत त्यांच्यासोबत काम केले आहे. ही मालिका संपल्यानंतर दोघांनी दुसऱ्या मालिकेत एकत्र काम केले. मात्र, कोरोनाच्या कालावधीनंतर कामात व्यस्त असल्याने वीणा कपूरशी संपर्क झाला नसल्याचे त्याने म्हटले आहे. वीणा यांचे निधन झाले यावर विश्वास बसत नाही, असेही नीलू कोहलीने म्हटले आहे.

काय पोस्ट केले नीलू कोहलीने ?

नीलू कोहलीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नीलू कोहलीने लिहिले की, “वीणाजी तुम्ही यापेक्षा चांगल्यासाठी पात्र आहात. तुमच्यासाठी ही पोस्ट लिहिताना मला वाईट वाटत आहे. काय सांगू आज माझ्याकडे शब्द नाहीत. एवढ्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्ही शेवटी शांततेत असाल अशी आशा आहे.

काय आहे प्रकरण ?

जुहू परिसरातील वीणा कपूर यांच्या बंगल्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. वीणा यांच्या स्वतःच्या मुलाने आपल्या ७४ वर्षीय आईची म्हणजेच वीणा यांची बेसबॉलच्या बॅटने हत्या करून त्यांचा मृतदेह माथेरान येथील जंगलामध्ये फेकून दिला. पण अमेरिकेत राहणार्‍या त्यांच्या दुसर्‍या मुलाला याचा संशय आला आणि त्यांनी जुहू पोलिसांना याबाबत माहिती दिली.

चौकशीदरम्यान, मुलाने पोलिसांना सांगितले की त्याने रागाच्या भरात बेसबॉलच्या बॅटने आपल्या आईला अनेक वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात 12 कोटी रुपयांचा फ्लॅट मिळवण्यासाठी आरोपी मुलाने आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर मृतदेह एका काडीत बांधून मुंबईपासून ९० किमी अंतरावर असलेल्या माथेरानच्या जंगलात फेकून दिला. त्याने आईचा मृतदेह रेफ्रिजरेटरच्या डब्यात पॅक केला. जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. एवढी मोठी पेटी जंगलात फेकण्यासाठी आरोपींनी घरातील नोकराची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in