आरोग्य विभागाच्या चिंतेत भर ;स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

१ ते २४ जुलैपर्यंत मलेरियाचे ३९७ रुग्ण, गॅस्ट्रोचे ५२४ रुग्ण, लेप्टो ३४, डेंग्यूचे ५० रुग्ण आढळले होते
आरोग्य विभागाच्या चिंतेत भर ;स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असतानाच पावसाळी आजारांचा धोका वाढला आहे. २४ ते ३१ जुलैदरम्यान स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत ४३ने वाढ झाल्याने स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला आहे. तर मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यंदाही पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. १ ते २४ जुलैपर्यंत मलेरियाचे ३९७ रुग्ण, गॅस्ट्रोचे ५२४ रुग्ण, लेप्टो ३४, डेंग्यूचे ५० रुग्ण आढळले होते; मात्र एका आठवड्यात म्हणजेच २४ ते ३१ जुलैदरम्यान मलेरियाचे ५६३, गॅस्ट्रो - ६७९, स्वाईन फ्ल्यू - १०५, लेप्टो - ६५ व डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले असून, २४ ते ३१ जुलैदरम्यान साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in