अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक मोहित कंबोज यांच्या विरोधात आक्रमक

मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडा आहेत, ते सर्वाना माहित आहे' असे वक्तव्य...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक मोहित कंबोज यांच्या विरोधात आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. कंबोज यांच्या ट्विटचा समाचार घेताना राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी 'मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडा आहेत, ते सर्वाना माहित आहे' असे वक्तव्य केले आहे. ते मुंबईत विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते. तसेच कंबोज हे भाजपचे भोंगा आहेत असेदेखील मिटकरी म्हणाले.

मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्विट केले. एका ट्विटमध्ये कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, 2019 मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे." या ट्विटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या महान नेत्याचा पर्दाफाश करू असेही कंबोज यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in