भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य

शहरातील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी आणि विकासासाठी प्राधान्याने प्रयत्नशिल राहणार
भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य

भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असून शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्त अजय वैद्य हे भिवंडी राज्यकर विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. नवनियुक्त भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी गुरुवारी दुपारी कामावर रूजू होऊन येथील पदभार स्वीकारल्यामुळे महापालिका उपायुक्त दीपक झिंजाड यांनी महापालिकेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवीन प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी यावेळी सांगितले की, भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार असून, येथील अडचणी सोडविण्यास मी कटिबद्ध राहणार आहे. यासाठी त्यांनी कामावर रूजू झाल्यानंतर महापालिकेच्या सर्व विभागांचा आढावा घेऊन, मूलभूत सुविधा, शहरातील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी आणि विकासासाठी प्राधान्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले.

दरम्यान आयुक्त अजय वैद्य यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, सहा. संचालक नगररचना अनिल येलमामे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in