मॅनहोलचे झाकण उघडले 'अलार्म' वाजणार-डी वॉर्डात प्रायोगिक तत्त्वावर डिवाईस बसवले

झाकणं चोरांविरोधात थेट फौजदारी गुन्हा
मॅनहोलचे झाकण उघडले 'अलार्म' वाजणार-डी वॉर्डात प्रायोगिक तत्त्वावर डिवाईस बसवले

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार फटकारल्यानंतर मुंबई महापालिकेने उघड्या मॅनहोलचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. मॅनहोलचे झाकणं उघडल्यास अलार्म वाजणार असून, प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या वॉर्डात डिवाईस बसवण्यात आले आहे. झाकणं उघडताच अलार्म वाजणार असून, बाबुला टॅक येथील कंट्रोल रुमला मेसेज जाणार आहे.मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिकेने कंबर कसली असून, झाकणं चोरांविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

पर्जन्य जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिन्यांचे सुमारे एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उघड्या मॅनहोल बंदीस्त करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने वेळोवेळी कान उधडणी केल्यानंतर आता मुंबई महापालिकेने उघड्या मॅनहोलचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. मॅनहोलवर संरक्षित जाळ्या बसवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. कृती आराखड्यानुसार पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी असलेल्या मॅनहोलवर स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या टप्याटप्याने बसवणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले.‌

भंगार विक्रेते पालिकेच्या रडारवर
तसेच पर्जन्य जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिन्यांवरील चोरीचे झाकणं खरेदी करणाऱ्या भंगार विक्रीत्यांवर भारतीय दंड संहिता कलम ४११,४१२,४१३ व ४१४ अनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भंगार विक्रेत्यांना दिला आहे. दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी झाकणं उघडताच पालिकेच्या चौकी वॉर्ड ऑफिसला माहिती द्यावी अथवा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

१४ ठिकाणी डिवाईस बसवणार!
डिजिटल स्मार्ट मॅन हे तंत्रज्ञान मॅनहोलच्या खाली एक फुटावर बसवण्यात येणार असून याची बॅटरी एक वर्षें चालेल. तसेच मुंबई शहरात १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल स्मार्ट मॅन होल'बसवण्यात येणार असून, डी वॉर्डातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पाणी तुंबणाऱ्या मॅनहोलवर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

येथे संपर्क साधा
आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष
१९१६, २२६९४७२५/२७

पर्जन्य जल वाहिनी कक्ष
२४३०९८१७, २४३०९४७२

मलनिस्सारण विभाग
शहर - ०२२२३७३८९४८ / ५१
पश्चिम उपनगर - ९८३३५३९०४४
पूर्व उपनगर - ९८३३५३९०५५, ०२२२५२५१३५७

मुंबई शहर व दोन्ही उपनगरात मॅनहोल
पर्जन्य जल वाहिनी विभाग

शहर - २७,०७८
पूर्व उपनगर - १५,९८३
पश्चिम उपनगर - ३१,६२१

मलनिस्सारण वाहिनी विभाग
एकूण मॅनहोल - ७४,६८२

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in