शहरातील सर्वाधिक कोरोनारुग्ण अंधेरीत ; वांद्रे, कुलाबा, चेंबूरमध्ये झपाट्याने वाढ

मार्च २०२०मध्ये कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली
शहरातील सर्वाधिक कोरोनारुग्ण अंधेरीत ; वांद्रे, कुलाबा, चेंबूरमध्ये झपाट्याने वाढ

गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या बळावली आहे. शहरात सध्या अंधेरीत सर्वाधिक कोरोनारुग्ण असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अंधेरी पश्चिम येथे गेल्या दोन आठवड्यांत एक हजार ४४१, तर अंधेरी पूर्व येथे ९१५ रुग्ण आढळले आहेत. त्यांनतर वांद्रे, कुलाबा, चेंबूर या भागांचा क्रमांक लागतो.

मार्च २०२०मध्ये कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली. कोरोनाच्या चौथ्या लाटेला गेल्या महिन्यात थोपवल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या बळावू लागली आहे. सध्या वांद्रे येथे ९४५, तर चेंबूरमध्ये १०००हून अधिक कोरोनारुग्ण असल्याचे समजते. बहुतांश रुग्ण हे गृहनिर्माण संकुलात आढळत असून झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. त्यातही असंख्य रुग्ण होम क्वारंटाईनला प्राधान्य देत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in